Latest Marathi News

Trending Now

संत वामनभाऊ गड जमदारवाडी येथे आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून सभामंडपाठी पंचवीस लाख रुपये निधी

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे हस्ते भुमिपुजन.

0

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथे संत वामनभाऊ महाराज यांचे मंदिर आहे जामखेड जमदारवाडी रोडलगत भव्य अशा प्रांगणात संत वामनभाऊ गडाची निर्मिती करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दररोज धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत त्याचबरोबर श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडीचे एकमेव गोल रिंगण भाऊंच्या मंदिरासमोर होत आहे. सालाबाद प्रमाणे भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सर्व कार्यक्रमांसाठी सभामंडपाची मागणी ग्रामस्थांनी आ. रोहित पवार यांच्याकडे केली होती आणि आज त्या सभामंडपाठी आ. रोहित पवार यांनी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद हद्दीत सुमारे पंचवीस लक्ष रुपये खर्च करून सभामंडप होणार आहे.

आज दिनांक १६ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व जमदारवाडी ग्रामस्थांनी नारळ वाढवून कुदळ टाकून भुमिपुजन करण्यात आले.
‌ यावेळी राष्ट्रवादीचे प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात,संचालक अमोल राळेभात ,प्रा.लक्ष्मण ढेपे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, नरेंद्र जाधव, प्रविण उगले,ह. भ. प. दादासाहेब महाराज सातपुते, आण्णासाहेब नेटके, तुकाराम नेटके, हिरालाल नेटके, दत्तात्रय आजबे, अर्जुन नेटके,हरिभाऊ आजबे,कैलास नेटके, वसीम सय्यद, उमर कुरेशी, बाबासाहेब मगर,प्रशांत राळेभात, अशोक घुमरे, अनिल नेटके, हरिभाऊ कदम नागनाथ आजबे,भाऊसाहेब आजबे, बाळु नेटके, रामहरी आजबे पत्रकार संतोष बारगजे,अशोक वीर,ज्ञानेश्वर आजबे, विष्णु राळेभात, नाना वीर, रघुनाथ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.