Latest Marathi News

Trending Now

आयडीएफसी फर्स्ट बँक शाखा जामखेड मार्फत सीएसआर फंड अंतर्गत

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप

0

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे आज रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक शाखा जामखेड मार्फत सीएसआर फंड अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना बँकेच्या कारभाराविषयी विशेष माहिती देण्यात आली.डेबिट,क्रेडिट,ड्राफ्ट, चेक,बँकिंग क्षेत्रातील अनेक संकल्पना आलेल्या मान्यवरांनी मुलांना समजावून सांगितले.यावेळी सीएसआर मॅनेजर महाराष्ट्र राज्य शरद देठे , पवन खांडे ,मोनिका राऊत, रतन सानप यांनी आयडीएफसी फर्स्ट बँके मार्फत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रबोधन केले.
यावेळी मुख्याध्यापक बळीराम अवसरे आणि शाळेचे सर्व शिक्षकवृंद प्रताप पवार सर, संजय आरेकर, जया चौभारे, सुजाता राक्षे, शितल कदम, शुभांगी साळुंके, नीता तांबे, रूपाली कांबळे मॅडम आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर शाळेचे मुख्याध्यापक बळीराम अवसरे सर यांनी प्रास्तावना केले . सुत्रसंचलन प्रताप पवार तर आभार प्रदर्शन संजय आरेकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.