Latest Marathi News

Trending Now

देशात सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक, 4 जूनला निकाल; निवडणूक आयोगाने केले जाहीर

0

नवी दिल्ली – देशभरातील जनता गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चुनाव का पर्व, देश का गर्व या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. त्यामध्ये, १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. निवडणुकांच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. ४ जूनला मतमोजणी होईल. निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात १९ एप्रिल,२६ एप्रिल,७ मे,१३ मे आणि २० मे रोजी मतदान होईल.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा

पहिला टप्पा – मतदान तारीख – 19 एप्रिल
महाराष्ट्र – रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर

दुसरा टप्पा – मतदान तारीख – 26 एप्रिल
महाराष्ट्र – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – मतदान तारीख – 7 मे
महाराष्ट्र – रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – मतदान तारीख – 13 मे
महाराष्ट्र – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – मतदान तारीख – 20 मे

महाराष्ट्र – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतल्या 6 जागा

 

Leave A Reply

Your email address will not be published.