Latest Marathi News

Trending Now

जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व मान्यवरांच्या हस्ते संपन्न

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बीड रोड काॅर्नर येथील सोले पाटील काॅम्प्लेक्स येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जामखेड शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी सर्व शासकीय योजना अंतर्गत असणारी कामे व इतर सर्वसामान्य लोकांना येत असणाऱ्या अडचणी या कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्राध्यापक मधुकर राळेभात,माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार , प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पाटील,कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, संचालक दत्तात्रय सोले पाटील, शरद शिंदे,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, सागर सदाफुले, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक अमित जाधव, उमर कुरेशी,युवक शहराध्यक्ष वसीम सय्यद, युवा नेते महेंद्र राळेभात, समीर चंदन ,सरपंच बाळासाहेब खैरे, प्रवीण उगले, बापूसाहेब कार्ले, काकासाहेब चव्हाण,हरिभाऊ आजबे, एडवोकेट हर्षल डोके, अमोल लोहकरे,अनिल बाबर,महालिंग कोरे,प्रा.कैलास वायकर, संजय डोके, दादा महाडिक, मनोज कार्ले ,चांँद तांबोळी, महेश यादव, किरण कोल्हे, अनिल रेडे, सचिन शिंदे, अशोक पठाडे, सचिन डोंगरे, अशोक गिते व आमदार रोहित पवार यांचे स्विय सहाय्यक सचिन मोकाशे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.