Latest Marathi News

Trending Now

पत्रकार संघाचा राज्यस्तरीय उपक्रमशील पत्रकार पुरस्कार वैभव स्वामी यांना जाहीर

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभहस्ते पुण्यात होणार सन्मान सोहळा

0

बीड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आयोजित पुणे येथील आहेर गार्डन वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन आणि परिसंवाद व पत्रकार गौरव समारंभ होणार आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तर पुरस्कार गौरव सोहळा महाराष्ट्राचे जेष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे लाभणार आहेत. या सोहळ्यामध्ये पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांना पत्रकार संघाचा मानाचा राज्यस्तरीय उपक्रमशील पत्रकार या पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे येथील आहेर गार्डन, व्हीआयपी बँक्वेट हॉल, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळच्या पहिल्या सत्रात 10 वाजता उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती आणि महामंत्री आमदार श्रीकांत भारतीय यांची विशेष उपस्थिती लाभेल.सायंकाळच्या 4 वाजण्याच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील नामवंत पत्रकारांचा गौरव विविध पुरस्काराने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, आमदार बच्चुभाऊ कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गुणगौरव सोहळ्यामध्ये पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड येथील दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांना राज्यस्तरीय उपक्रमशील पत्रकार या सन्मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.