Latest Marathi News

Trending Now

जामखेड शहर कडकडीत बंद ; व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, अर्थिक, मानसिक छळवणूक केली त्याच्या निषेधार्थ व डॉ. भास्कर मोरे या अद्याप अटक करण्यात आली नाही यामुळे बुधवार दि. १३ रोजी जामखेड शहर कडकडीत बंद होते . मेनरोड ; खर्डा रोड ; बीड रोड ; तपनेश्वर रोड येथील सर्व दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता . जामखेड बंदची हाक उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले होते. त्यानुसार जामखेड शहर हे ग्रामस्थाकडून १००% बंद पाळण्यात आले .रत्नदीप विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता.
आंदोलक विद्यार्थी व शिवप्रतिष्ठाण तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा म्हणुन जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.