Latest Marathi News

Trending Now

आगामी लोकसभा निवडणुक कामातून दिव्यांग,दुर्धर आजारग्रस्त व महिला कर्मचाऱ्यांना वगळावे

म.रा.प्रा.शिक्षक संघ,गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

0

जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ , गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या वतीने जामखेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रशासकीय पातळीवर अनेक प्रश्न मार्गी लावले जात आहेत.त्याचा नुकताच प्रत्यय तालुक्यातील शिक्षकांना येत असून याबाबत जिल्हा परिषद वित्त विभाग व तहसिल कार्यालयाकडे पाठपुरावा करत काही प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.

जामखेड तालुक्यातील सन २०२०-२१ मधील २१ प्राथमिक शिक्षकांचे साॅफ्टवेअर प्रॉब्लेममुळे भविष्य निर्वाह निधीच्या थकीत रक्कम जमा करण्यासाठी काल जि.प.अहमदनगर येथे मा.लेखा व वित्त विभागात पाठपुरावा करून खर्डा केंद्रातील ३ शिक्षकांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १६ शिक्षकांचा निधी तातडीने वर्ग होईल.तसेच राज्य मागासवर्ग आयोगामार्फत झालेल्या मराठा सर्वेक्षणाचे मानधन मागणी जिल्हा कार्यालयाकडे केली असून मानधन प्राप्त होताच सर्वेक्षकांच्या खात्यात वर्ग केली जाईल.तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामातून दिव्यांग,दुर्धर आजारग्रस्त व महिला कर्मचाऱ्यांना कामातून वगळण्यात यावे व
बी.एल.ओ.शिक्षकांची इतर ठिकाणी नेमणूक करण्यात येऊ नये असे निवेदन महेश अनारसे नायब तहसिलदार जामखेड यांना देण्यात आले.याप्रसंगी बॅंकेचे संचालक संतोषकुमार राऊत,विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ चव्हाण,जिल्हाध्यक्ष (द.)केशवराज कोल्हे,शिक्षक संघ तालुकाध्यक्ष गणेश नेटके, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष अविनाश नवसरे,जिल्हा प्रतिनिधि अर्जुन पवार इ.उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.