Latest Marathi News

Trending Now

नगरसेवक बिभिषण धनवडे यांच्या प्रयत्नांना यश

खंडोबा मंदिर येथे खा.डाॅ.सुजय विखे यांच्या माध्यमातून ५ लाख रुपयांचे सोलर हायमॅक्स

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांच्या प्रयत्नातून जामखेड शहरातील खंडोबा मंदिर येथे अहमदनगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून
५ लाख रुपयांचे सोलर हायमॅक्स चे उद्घाटन करण्यात आले.
नगरसेवक बिभीषण (मामा)धनवडे यांनी या सोलर हायमॅक्स साठी खासदार डॉक्टर सुजय पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता सोलर हायमॅक्स दिल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने खासदार डॉ सुजय विखे पाटील व नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांचे आभार मानले. जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांनीही त्यांच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये विविध‌ विकास कामांच्या माध्यमातून प्रभागातील जवळपास सर्वच कामे मार्गी लागली असल्याचे दिसून येईल. सध्या नगरपरिषदेत प्रशासकराज असले तरी ते आपला प्रभाग व जामखेड शहरातील समस्या व विकासकामे करण्यासाठी सतत अग्रेसर असतात.यावेळी बिभिषण धनवडे ,अरुण वराट ,अनंता निमोनकर
बाप्पू निमोनकर,रघुनाथ निमोनकर,शंकर निमोनकर,अशोक निमोनकर,दिगंबर निमोनकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.