Latest Marathi News

Trending Now

वडवणी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती कमिटीची स्थापना.

अध्यक्षपदी महादेव उजगरे यांची सर्वानुमते निवड

0

वडवणी प्रतिनिधी
वडवणी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीची स्थापना करण्यात आली असून या जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी रिपाईचे तालुका अध्यक्ष महादेव उजगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्तरावर अत्यंत हर्षोल्लासात आणि आनंदात हा जयंती सोहळा साजरा केला जातो.यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या जयंती सोहळ्याच्या आयोजन आणि नियोजनसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.यामध्ये अध्यक्ष म्हणून रिपाईचे तालुका अध्यक्ष महादेव उजगरे,उपाध्यक्ष म्हणून राजेश उजगरे,उपाध्यक्ष दिलीप रोकडे,उपाध्यक्ष किरण उजगरे,सचिव म्हणून राहुल घाडगे, सचिव श्याम उजगरे,कोषाध्यक्ष ॲड.भास्कर उजगरे,कोषाध्यक्ष प्रकाश तांगडे,कोषाध्यक्ष श्याम उजगरे,कोषाध्यक्ष अविनाश साळवे,
संघटक सुखदेव उजगरे,संघटक बाबासाहेब वाघमारे,संघटक रोहित उजगरे,सहसंघटक राज उजगरे,सहसंघटक,रंजीत उजगरे, सहसंघटक अक्षय उजगरे,सहसंघटक अमर मस्के ,सह संघटक स्वप्निल जावळे, सहसंघटक नाना पाटोळे,सहसंघटक बबलू उजगरे,सहसंघटक अमोल वाघमारे, सहसंघटक सुरेश उजगरे,सहसंघटक विश्वनाथ उजगरे,सोशल मीडिया प्रमुख ॲड.ऋषिकेश उजगरे ,सोशल मीडिया प्रमुख रोहित उजगरे यांच्यासह आदींच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यावर्षी अनोख्या पध्दतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्याबरोबरच भिम ज्योत, ध्वजारोहण व भव्य स्वरूपात अन्नदान केले जाणार आहे.तमाम समाज बांधवांच्या आग्रहाखातर यावर्षी इंडियन आयडॉल प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांच्या मंजुळ आवाजातील भिम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.आणि दिनांक 30 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची अत्यंत हर्षोल्लासात आगळ्यावेगळ्या पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे ही जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव उजगरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.