Latest Marathi News

Trending Now

महिलांना सन्मान देणारी संस्था म्हणजे ग्रामीण विकास केंद्र-श्रीम. संजीवनी ताई पाटील खर्डा सरपंच

0

 

आज दिनांक १२ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता खर्डा येथे श्री शिरोमणी नामदेव महाराज मंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा पार पडला.या मेळाव्याचे अध्यक्ष खर्डा गावचे सरपंच श्रीम.संजीवनी ताई पाटील आपल्या मनोगतामध्ये बोलल्या की, ग्रामीण विकास केंद्र सामुदायिक मदत केंद्र खर्डा हे महिलांच्या अधिकाराबाबत, गरीब, शोषित, पीडित महिलांना अधिकार मिळवून देण्याचे काम करीत आहे. तसेच सरपंच म्हणून माझ्याकडून जी मदत लागेल ती मदत करण्यासाठी कायम कटिबध्द असेल. ग्रामीण विकास केंद्र संस्था ही शाहू,फुले, आंबेडकरी विचाराने चालणारी व संविधानाला मानणारी तसेच महिलांचा सन्मान करणारी हा संस्था आहे.तसेच संस्थेच्या माध्यमातून खर्डा गावामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेकडो महिलांना भेटला असून त्या महिला आज फायदा घेत आहे. ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव आपले मनोगत मांडताना म्हणाल्या की, ग्रामीण विकास केंद्र माय लेकरू प्रकल्प हा महिलांचा सन्मान करणारी संस्था आहे. महिलांनी अधिकार कसे मिळवायचे, त्याच्यासाठी रात्र दिवस धरपडून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. संस्थेचा जन्मच तुमच्या सेवेसाठी करण्यात आला आहे. जनतेचा ध्येय हे अन्यायग्रस्त, पीडित, वंचित महिलांचा सर्वांगिण विकास करणे हा असून संस्थेचा प्रत्येक कार्यकर्ता रात्र दिवस तुमचा भाव म्हणून, बहीण म्हणून उभा राहू काम करत आहे. माय लेकरू प्रकल्पाचे नंदू कुमार गाडे सर कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणाले की, आपण आपल्या अधिकाराला हिसकावून घ्यायला शिका. महिलांनी पुढे येऊन आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. तसेच प्रत्येक महिलेने ज्या संविधानाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाला समजून घेतले पाहिजे. तसेच ॲड.यशवंत गायकवाड यांनी हिंदू कोड बिल बाबत मांडणी केली तसेच माता रमाई याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी किती महत्त्वाचे होते या बाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी खर्डा पोलीस स्टेशन येथील कर्मचारी श्रीम.अनुराधा घोगरे आणि श्रीम.आयोध्या पोकळे यांनी सर्व महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनतर श्रीम. मंगल शिंगारे म्हणाल्या की, महिलांनी चूल आणि मूल यापलीकडे पाहणे गरजेचे आहे. आपण देशांमध्ये जे घडतं त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण विकास केंद्र संचलित समुदाय मदत केंद्र खर्डा येथील प्रमुख विशाल पवार म्हणाले की, माझ्या माता बहिणींना या समाजात मान सन्मानाने जगत यावे यासाठी पूर्ण टीम रात्रंदिवस कष्ट करून महिलांना त्याचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी काम करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहांचे व्यवस्थापक मा. संतोष चव्हाण यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माय लेकरू प्रकल्पाचे प्रमुख मा.सचिन भिंगारदिवे, मा.राजू शिंदे,श्रीम. रजनी औटी, घरेलू महिला कामगार संघटनेच्या श्रीम. द्वारका ताई पवार, समता फेलो श्रीम.दिपाली काळे, मा.शहानुर काळे, मा ऋषिकेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मा.भीमराव सुरवसे, श्रीम.नीता इंगळे, श्रीम. मंगल शिंगारे, श्रीम. उर्मिला कवडे, श्रीम. मनीषा काळे, श्रीम. दिपाली कवडे, श्रीम.मुमताज मदारी, रेश्मा मदारी, सुमनबाई कुसळून, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी मा.सुरेज तायडे, श्रीम. अस्मिता तायडे, श्रीम.प्रेरणा खडके, सुनिता कांबळे, सुनीता गुंड, जयश्री वरकड, अनिता सुरवसे, ज्योती खटावकर, अंजली पाचरणे, अश्विनी जोशी, अश्विनी पाचारणे, सनामा मदारी, दिपाली सकट, सुवर्णा पवार, पुष्पा पवार, अक्काबाई लोंढे, शालन लोंढे, रत्ना लोंढे, सावित्री लोंढे, मंदा दाताळ, सीमा लोंढे, शालन घोडके, प्रियांका सकट, नंदा खरात, वैशाली साबळे, पुनम कसबे, अलका लोंढे, ताराबाई कसबे, सांगळे मनीषा, शिंदे उषा आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाची सांगता भारतीय संविधानाची प्रस्ताविकेचे वाचन करून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.