Latest Marathi News

Trending Now

मुंबई येथे राष्ट्रीय नारीभूषण एक्सलन्स पुरस्काराने लक्ष्मी पवार सन्मानित

0

जामखेड प्रतिनिधी

दिनांक १० मार्च २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनोव्हेटिव्ह नारीशक्ती सन्मान संमेलन मुंबई येथे राष्ट्रीय नारी भूषण एक्सलन्स पुरस्कार जामखेड येथील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांना डॉ.मिना कुटे, तेजस्विनी गलांडे व प्रा.फरिदा लांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी‌ अणुव्रतसेवी प्रा. डॉ. ललिता जोगड, अभिनेत्री साक्षी परांजपे,स्मिता मोहरीर, अभिनेत्री अश्लेषा रोकडे,विजयश्री पाटील,सलमा एन. खान (संचालिका. इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन),संकल्पना व नियोजन एन. डी. खान (संस्थापक,एम.व्ही.एस) ,डॉ. श्रेयश्री गोडांबे,स्नेहा चांदोरकर (लायन्स क्लब सदस्य तथा नवीमुंबई उपाध्यक्ष) आदी उपस्थित होते.

लक्ष्मी पवार हे गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक चळवळीत काम करत आहेत.आदिवासी व भटके विमुक्त माहिलांच्या विविध प्रश्नांवर समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत.वंचित,पिडीत माहिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी लढा देत आहेत.शासनाच्या विविध योजना तसेच संस्थेच्या माध्यमातून ५०० लोकांचे पाठपुरावा करून जातीचे दाखले दिले आहेत. याच कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनोव्हेटिव्ह नारीशक्ती सन्मान संमेलन मुंबई येथे राष्ट्रीय नारी भूषण एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, साहित्यिक नामदेव भोसले, सावकार भोसले, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे, मिरा तंटक, रुक्साना पठाण, राणी भोसले, सुभद्रा घायतडक,नंदा शेगर,साधना जाधव, जयश्री हतळगे, निशा पवार, अर्चना जाधव,कावेरी शिंदे,सोनाली समुद्र, उपेंद्र आढाव,विजय कुलकर्णी,राम पवार, संतोष पिंपळे आदींनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.