Latest Marathi News

Trending Now

डॉ भास्कर मोरे यांस अटक करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

आमरण उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा

0

जामखेड प्रतिनिधी

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथील बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र यावेळी तहसीलदार गणेश माळी यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी लवकरात लवकर डॉ. भास्कर मोरे याला अटक करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.अशी मागणीचे निवेदन देण्यात आले .
यावेळी तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सुर्यकांत मोरे, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, बाजार समिती चे संचालक सुधीर राळेभात,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक मोहन पवार,निखिल घायतडक,उमर कुरेशी, संचालक सुरेश पवार, हरिभाऊ आजबे, महेश राळेभात, चाँद तांबोळी,
शहाजी गाडे ,सचिन शिंदे,महालिंग कोरे, महेश यादव,संदीप बोराटे, आमदार रोहित पवार यांचे स्विय सहाय्यक सचिन मोकाशे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.