Latest Marathi News

Trending Now

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड येथे सिंगल फेज डिपी चे लोकार्पण

0

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील सिंगल फेज डीपी लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते पार पडला.
‌ आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड शहरातील मिलिंद नगर, झोपडपट्टी (आरोळे वस्ती) मार्केट कमिटी (कृषी उत्पन्न बाजार समिती ),शिक्षक कॉलनी, ढवळे किराणा, दुर्गा माता मंदिर (बाजार तळ) , कुंभार तळे या भागामध्ये सिंगल फेज डीपी बसविण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात, बाजार समिती चे संचालक सुधीर राळेभात, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,शहराध्यक्ष वसिम सय्यद, रमेश आजबे,शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहन पवार, बाबासाहेब मगर,युवा नेते प्रवीण उगले, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, अमोल गिरमे,संदीप राळेभात‌,अहमदनगर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांद तांबोळी ,संदीप गायकवाड, सचिन शिंदे,शामराव शिंदे आदी पदाअधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.