Latest Marathi News

Trending Now

जामखेड येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल ची वाटचाल ही प्रगती पथावर आहे - गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0

जामखेड । प्रतिनिधी

प्राध्यापक कैलास माने यांनी ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून जामखेड सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कमीत कमी फी मध्ये इंग्रजी मीडियम चे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्याच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न
करावा.शिक्षणाबरोबरच संस्कार ही नितीमुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल करत आहे.शाळेची वाटचाल ही प्रगती पथावर आहे.भविष्यात शाळेने उंच भरारी घ्यावी.असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.
जामखेड शहरातील बिड रोड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन आदित्य गार्डन च्या प्रांगणात उत्साहात संपन्न‌ झाले. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात‌ आले.तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
दीपप्रज्वलन करण्यात आले.
वर्षभरात स्कूल मध्ये अनेक उपक्रम राबविण्यात आले होते.विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्री-प्रायमरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध नृत्याचे कार्यक्रम सादर केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गाणी, स्वागत नृत्य,धार्मिक, आधुनिक
नृत्यप्रकार,बहुभाषिक गीतगायन , देशभक्तीपर गीत, सिनेमागीते, मराठी लोकगीते, नाटिका सादर करून तसेच आपल्या अभिनयातून उपस्थितांची मने विद्यार्थ्यांनी जिंकली. शिप मटेरियल कलर्स या थीमवर आपली प्रतिभा दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. होतकरू मुलांनी रंगमंचावर सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालक व शहरातील ग्रामस्थ, युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल चे संचालक प्रा. कैलास माने, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेलेकर, सौ. वर्षा कैलास माने, डॉ प्रविण मिसाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सिध्दनाथ भजनावळे, डॉ.वैशाली
मिसाळ,नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे, उद्योजक संतोष फिरोदिया, डॉ सादेख पठाण,डॉ.अल्ताफ शेख, सरपंच लहु शिंदे,अर्शद शेख,कपिल माने, चाँद तांबोळी आदी पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल रियाआरोरा, शर्मिला लटपटे,माया पवार,राधा बांगर,दशरथ कोळेकर, बाळासाहेब साळवे, अवधूत वासकर, कोरिओग्राफर शिक्षक आकांक्षा पाटील,राधिका फुटाणे आदी शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रिया आरोरा मॅडम तर सूत्रसंचालन प्रियांका पाटील शेळके यांनी केले व आभार सर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.