Latest Marathi News

Trending Now

बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला युवक क्रांती दलाचा पाठिंबा

डॉ भास्कर मोरे वर कडक कारवाई करा ; युवक क्रांती दलाची मागणी तहसिलदारांना निवेदन

0

 

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांचा छळ आणि त्यांना धमकावल्याप्रकरणी रत्नदीप मेडीकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नापूरच्या डॉ भास्कर मोरे वर कडक कारवाई करा तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला युवक क्रांती दलाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.

रत्नदीप मेडीकाल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नापूर ता. जामखेड चा संस्थापक डॉ. भास्कर मोरे याच्याविरूद्ध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचे आर्थिक शोषण करणे, विद्यार्थीनींना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे, गुण कमी देतो असे सांगून धमकावणे, वेगवेगळ्या मार्गाने जास्तीचे शुल्क आकारणे, परीक्षा हॉलमध्ये हस्तक्षेप करणे, तसेच कॉलेज मध्ये स्टाफ ची लवकरात लवकर पूर्तता करावी अशा अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोरेच्या अन्यायाविरूद्ध एल्गार पुकारला आहे. युवक क्रांती दल, जामखेडच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच डॉ भास्कर मोरेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे युवक क्रांती दलाने (युक्रांद) आज निवेनाद्वरे मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

यावेळी विशाल नेमाने (अध्यक्ष), योगेश अब्दूले (उपाध्यक्ष), अनिल घोगरदरे (सचिव), कृष्णा पवार, कृष्णा उगले, शंकर माळी, भाऊसाहेब देवकर, जयराम झेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.