Latest Marathi News

Trending Now

जनविकास सेवाभावी संस्थेत माहिला दिन उत्साहात साजरा

0

जामखेड प्रतिनिधी

परमात्म्याने धरतीवर येऊन महिलांना सलोख्यासाठी ज्ञानाचा कळस दिला आहे .प्रामुख्याने महिलांना प्रमुख स्थान आहे तसेच सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आज महिला आहे.घरामध्ये माहिला नसेल तर घराला घरपण येत नाही. महिला दिनानिमित्त लक्ष्मी पवार यांनी महिलांना पुस्तके देऊन सन्मान केला तो एक कौतुकास्पद आहे.असे मत यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय येथील भारती दीदी यांनी व्यक्त केले.
शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने माहिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँ साहेब, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच उपस्थित माहिलांचा सन्मान महापुरुषांचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय येथील भारती दीदी ( बहेन जी) ,शोभा कांबळे, रोहिणी काशिद, वैशाली शिंदे,मिरा तंटक,रुक्साना पठाण, जयश्री हतळगे, निशा पवार,अलका पिंपळे, शुभदा घायतडक, अश्विनी रेळेकर, अर्चना जाधव,साधना जाधव, केडगावकर माता,सुंदरा माता, नंदिनी शेगर,प्राची क्षिरसागर,राणी भोसले,केशर काळे, ज्योती काळे आदी माहिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिरा तंटक यांनी केले तर आभार निशा पवार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.