Latest Marathi News

Trending Now

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सावधान; तर आपल्यावरच होईल कारवाई

जामखेड पोलिस स्टेशन च्या वतीने नोटीस जारी

0

 

जामखेड प्रतिनिधी

सोशल मीडियावर आपल्या पक्ष, संघटना आणि नेत्यांच्या समर्थनार्थ राजकीय पोस्ट टाकणाऱ्या सोशल मीडिया वीरांना निवडणूका संपेपर्यंत मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. व्हॉटसअप ग्रुप अॅडमीन, ग्रुप मधील सदस्य तसेच फेसबुक वापरकर्त्यांना सुचित करण्यात येते की, आपण सोशल मीडिया ॲडमिन व सदस्य आहात तसेच आपण फेसबुक वापरतात तरी आपण सोशल
मीडिया ग्रु वर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे पोस्ट शेयर करणार नाहीत. आपण आपल्या पक्षाची, संघटनेची विचारधारा,ध्येयधोरणे, पक्षाची / संघटनेची कामे याविषयी माहिती सोशलमिडीयावर प्रसारीत करीत असतात. ही माहिती सोशल मिडीयावर प्रसारीत करीत असताना एखाद्या पक्षाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष उत्पन्न
होईल किंवा दोन व्यक्तीमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये फोटो, व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रसारीत करणार नाहीत. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय नेत्यांसह त्यांच्या‌ कार्यकर्त्यांना यापुढे घ्यावी
लागणार आहे. कारण जामखेड पोलिसांनी याबाबत एक नोटीस जारी केली असून याद्वारे सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा
दिला आहे. त्याबरोबर सोशल मीडिया ॲडमीन आणि सदस्यांनाही सावधानतेचा‌ इशारा जारी केला आहे.जामखेड पोलीस स्टेशन हददीतील कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे पोलीसांचे कर्तव्य असुन मी पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर मला प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे नोटीस देत आहे. तरी आपणाकडुन अशा प्रकारची पोस्ट, फोटो, किंवा व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रसारीत होवुन आपणाकडुन दखलपात्र अपराध घडल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरुन आपणाविरुध्द प्रचलित कायदान्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल. व सदरची नोटीस पुरावा म्हणून मा. न्यायालयात सादर केली जाईल. याची नोंद घ्यावी.असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.