Latest Marathi News

Trending Now

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ; अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी अमर चाऊस

0

 

जामखेड प्रतिनिधी

युवा नेते अमर चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक अहमदनगर (दक्षिण)जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली दिनाक ५ मार्च २०२४ रोजी प्रदेश कार्यकारिणीची अहमदनगर राष्ट्रवादी भवन येथे मीटिंग पार पडली. या मिटींगला अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब,दादाभाऊ कळमकर ,अभिषेक कळमकर, शौकतभाई तांबोळी, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अथर खानसमीर भाई पठाण आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अल्पसंख्याकचे जिल्हास्तरीय कार्यकरणी जाहीर करण्यात आली. जामखेड तालुक्याचे नान्नज येथील रहिवासी अमर भाई चाऊस अल्पसंख्याक अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी अमर चाऊस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ,प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना चाऊस म्हणाले की, माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडेल तसेच
माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेल , पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहून गोर- गरीब लोकांचे प्रश्न आमदार रोहित पवार यांच्यामार्फत सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
या निवडीबद्दल अमर चाऊस यांचे जामखेड शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.