Latest Marathi News

Trending Now

जामखेड येथील बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन

रत्नदिप काॅलेजचा काळा बाजार थांबला पाहिजे,बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन च्या विरोधात बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी दि.५ मार्च २०२४ रोजी जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन च्या विरोधात बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजपासून ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढला.यावेळी बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले.

तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन येथे तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनात एकच रोष व्यक्त करत घोषणा
दिल्या.डाॅ.भास्कर मोरे हाय.,हाय ! आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करु.रत्नदिप काॅलेजचा काळा बाजार थांबला पाहिजे, असे बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी आहे. मला कमी मार्क मिळाले ( नापास झालो) तर मी काॅलेजच्या गेटला गळाफास घेऊन आत्महत्या करणार असे आंदोलन प्रसंगी कासुळे जयराम रावसाहेब या विद्यार्थ्यांने तहसीलदार गणेश माळी यांना सांगितले तसेच विद्यार्थी म्हणाले की, आता पुढचा मार्ग थेट पुणे विद्यापीठ येथे जाऊन न्याय मागणार.
निवेदनात म्हटले आहे की,नियमाप्रमाणे परीक्षा फी घेण्यात यावी अतिरिक्त फी घेवू नये. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांकडून ते किलोमीटर प्रमाणे पैसे घ्यावेत. गणवेश आकरणी योग्य असावी.अशा विविध मागण्या आहेत.

आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड,मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रतिष्ठान मैदानात उतरले आहेत. डॉ भास्कर मोरे यांच्यावर कारवाई झाली नाही तर मोरे यांच्या कॉलेजसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, सनी सदाफुले अनिल पाटील आदी तसेच मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले .यावेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सांगितले की, शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. या आंदोलना प्रसंगी प्रा. मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा,केदार रसाळ, रमेश आजबे,अवधूत पवार,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुरंग भोसले, रमेश आजबे, काकासाहेब कोल्हे,सागर घुमरे,अशोक पोटफोडे, जगन्नाथ म्हेत्रे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच या बाबत जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. आंदोलन हे रात्री अकरा वाजता मागे घेण्यात आले.

*चौकट*

सदर प्रकरणी संबंधित संस्थेच्या अध्यक्ष यांना बोलावून चौकशी करण्यात येईल तसेच विद्यार्थी यांच्या
मागणीनुसार विद्यापीठाच्या कुलगुरू यांना निवेदन पाठवले जाईल.

गणेश माळी
तहसीलदार, जामखेड

*चौकट*

विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून ६० तर
राज्य सरकारकडून ४० टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत असते. यापूर्वी ही रक्कम सरकार संस्थेच्या खात्यात जमा करीत असे. आता केंद्र सरकार त्यांचा ६० टक्के हिस्सा विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करते. विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित रक्कम महाविद्यालयास पुढील सात दिवसांच्या आत जमा करावी असे परिपत्रक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दहा दिवस उलटले तरी त्यांनी फी जमा केली नाही. त्यामुळे परीक्षा फॉर्म घेतले नाहीत. यातूनच ते वेगळा विषय मांडून आंदोलन करत आहेत.

-डॉ भास्कर मोरे अध्यक्ष रत्नदीप
मेडिकल फाउंडेशन

Leave A Reply

Your email address will not be published.