Latest Marathi News

Trending Now

जामखेड येथील जि.प.प्राथ.शाळा, तपनेश्वर येथे आनंद मेळावा संपन्न

विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारासाठी आनंदी बाजार हा उपक्रम खूप महत्वाचा - गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

0

 

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण-तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा.तसेच विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे. वर्गात मिळालेल्या शिक्षणाचे दैनंदिन जीवनात विद्यार्थ्याला करता यावे ,विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारासाठी आनंदी बाजार हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे पद्धतशीर व नियोजनपूर्वक आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक तपनेश्वर शाळेचे भरभरून कौतुक करत समाधान व्यक्त केले.
जामखेड येथील जिल्हा परिषद शाळा तपनेश्वर येथे दि.०६ मार्च २०२४ रोजी सकाळी १०..०० वाजता बाल आनंद मेळावा आठवडी बाजार चे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी सुरेश मोहिते, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, नवनाथ बडे, विक्रम बडे,शिक्षक बंँक चे संचालक संतोष राऊत, विनोद सोनवणे,नगरसेवक मोहन पवार, सामाजिक कार्यकर्ते अमित गंभीर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष महेंद्र आदे, उपाध्यक्ष धनराज पवार ,सुभाष साळवे, राजेंद्र काटकर,दिपाली भवर,अश्विनी वेदपाठक, मर्जिना शेख, निलम उगले
आदी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना ‘कमवा‎ व शिका’ याची जाणीव होण्यासह‎ विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी, यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा घेण्यात आला.‎ आनंद मेळाव्यात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी‎नी अतिशय उत्साहाने विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे‎ स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी,‎ भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन,‎ आप्पे, कचोरी, वडापाव, इडली,‎ मसाला पापड, भजे, पॅटिस आदी‎ खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
याप्रसंगी आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी प्रत्येक दुकानांना भेट देवून बाजार खरेदी केला तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आजचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा ठरला.

आनंदी बाजार यशस्वी व्हावा यासाठी मुख्याध्यापिका‌ जया चौभारे ,सुजाता राक्षे, प्रताप पवार सर, संजय आरेकर,
शुभांगी साळुंके, रूपाली कांबळे , नीता तांबे ,शितल कदम आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकूंदराज सातपुते व एकनाथराव चव्हाण यांनी केले तर आभार शुभांगी साळुंके यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.