Latest Marathi News

Trending Now

जामखेड तालुक्यात सत्ताधारी गटाला पुन्हा एकदा दे धक्का…

0

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील सत्ताधारी शिवाजीराव पाटील गटाला पुन्हा एकदा दे धक्का करत शिक्षक संघाचे सरचिटणीस महेश मोरे यांनी त्यांच्या समर्थकांसह संभाजीराव थोरात गटात जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सालके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रवेशाने जामखेड मधील शिक्षकांचे राजकारण ढवळून निघाले आहे.
नुकताच काही दिवसापूर्वी सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी संभाजीराव थोरात गटात प्रवेश केला होता त्यांच्या सोबत महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना भोसले तसेच अनेक शिक्षक नेते यांनीही प्रवेश केला होता त्याचबरोबर काल परवा शिक्षक समितीचे विद्यमान तालुकाध्यक्ष नवनाथ बहीर , माजी तालुकाध्यक्ष राम ढवळे यांनी त्यांच्या समर्थकासह प्रवेश केला होता आता पुन्हा सत्ताधारी गटाला सुरुंग लावत संघाचे विद्यमान सरचिटणीस महेश मोरे यांनी त्यांचे समर्थक गणेश रोडे, दादा डुचे, वसीम शेख, दृपद्द्राज डोके आदी कार्यकर्त्यांसह संभाजीराव थोरात गटात प्रवेश केला.
सध्या कोणतीही निवडणूक नाही काही नाही तरी गेल्या काही दिवसापासून जामखेड तालुक्यात सत्ताधारी गटाला सोडून अनेक शिक्षक संभाजीराव गटात प्रवेश करत आहेत त्यामुळे सत्ताधारी बाप्पू तांबे यांना हा मोठा शह असल्याचे सामान्य शिक्षकातून बोलले जात आहे.
संभाजीराव गटातील शिक्षक नेते राम निकम, किसन वराट, नारायण राऊत, नवनाथ बहिर्, नाना मोरे,विजय जाधव, अशोक घोडेस्वार यांची शिक्षकांच्या कमाबतबत असणारी तळमळ पाहून हा निर्णय घेतला असल्याचे सरचिटणीस महेश मोरे यांनी सांगितले यानंतर शिक्षकांचे प्रन सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगततून सांगितले.
संघटना चालवत असताना शिक्षकांचे प्रश्न महत्वाचे असतात आणि ते सोडविण्याचे काम संभाजीराव गट प्रामाणिक पणाने करत असल्यानेच इन्कमिंग मोठ्या प्रमाणत चालू असल्याचे बोलले जात आहे तसेच येणाऱ्या काही दिवसात अजून बरेच प्रवेश होणार असल्याची चर्चा ही दबक्या आवाजात शिक्षकात सुरू आहे त्यामुळे येत्या काळात बाप्पु तांबे यांना मोठा धक्का यानिमित्ताने बसनार असेच एकंदरीत चित्र दिसत आहे.
महेश मोरे यांच्या प्रवेशाने एक युवा नेतृत्व संभाजीराव थोरात गटाला मिळाले आहे त्यामुळे सर्वच शिक्षकमधून त्यांचं स्वागत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.