Latest Marathi News

Trending Now

युवा नेते अनिल(मामा) बाबर यांचा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा

कबधिर विद्यालय व ग्रामीण रुग्णालयात येथे फळे वाटप

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील लेहनेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे युवा नेते अनिल (मामा) बाबर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
आज रोजी जामखेड येथे सकाळी ११.०० वाजता युवा नेते अनिल (मामा) बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त
ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करून तसेच मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. मित्र परिवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जामखेड तालुका युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात,युवक शहराध्यक्ष वसिम सय्यद,युवक शहर उपाध्यक्ष महेंद्र राळेभात, पाडळी ग्रामपंचायत चे सरपंच बाळासाहेब खैरे, उद्योजक रावसाहेब नेटके, प्रविण खैरे, सचिन चव्हाण , प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी शाम जाधवर तसेच मुकबधीर विद्यालय चे गर्जे सर व दहिफळे सर आदी कर्मचारी व मित्र परिवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.