Latest Marathi News

Trending Now

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण साहित्य निर्मितीत डॉ.जगदीश पाटील यांचा सहभाग

0

 

जळगाव/सुरेश कोहली/प्रतिनिधि :
इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी बारा विषयांवर आधारीत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी प्रकाशित केलेल्या शिक्षक मार्गदर्शिका व सुलभक हस्तपुस्तिका लेखन, निर्मिती व विकसन यामध्ये जळगाव जिल्ह्यातून एकमेव डॉ. जगदीश पाटील यांचा सहभाग आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक सक्षमीकरणावर भर देण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील नववी ते बारावीच्या सर्व शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये पार पडले. हे प्रशिक्षण बारा विषयांवर आधारीत असून त्यासाठी तयार करण्यात आलेली शिक्षक मार्गदर्शिका व सुलभक हस्तपुस्तिका लेखन, निर्मिती व विकसन यामध्ये योगदान देणारे जळगाव जिल्ह्यातील एकमेव डॉ. जगदीश पाटील आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात त्यांनी राज्यस्तरीय सुलभक म्हणून भूमिका पार पाडली. त्यानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले व आता सध्या तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्गात सर्व शिक्षकांना सदरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षक मार्गदर्शिका 360 पानांची असून सुलभक हस्तपुस्तिका 136 पानांची आहे.
क्षमता वृद्धी प्रशिक्षण एकात्मिक स्वरूपाचे – क्षमता वृद्धी प्रशिक्षण हे विषयनिहाय नसून एकात्मिक स्वरूपाचे आहे. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण, एनसीएफ आंतरसमवाय क्षेत्रे, नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, एकविसाव्या शतकातील कौशल्ये व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, कुमारावस्थेतील मुले समजून घेताना, शाळा आधारित व क्षमता आधारीत मूल्यांकन, एनएएस-एसईएएस-पीजीआय कार्यपद्धती व विश्लेषण, संशोधन कार्यपद्धती – कृतिसंशोधन व नवोपक्रम, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग व प्रभावी शैक्षणिक नेतृत्व अशा बारा विषयांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.