Latest Marathi News

Trending Now

खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पार्श्वगायक सुदेश भोसले व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,काॅमेडी किंग सुनील पाल यांनी प्रेक्षकांची मने जिंकली

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड प्रतिनिधी ( भारतीय लोकशाही न्युज) :- दि.३ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने जामखेड येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात
संपन्न झाला. जामखेड येथील जामखेड महाविद्यालयाच्या मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या
कार्यक्रमाचा आनंद घेतला.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील व त्यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उत्सवमूर्ती महिला भगिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित असंख्य महिलांना योग्य ते
मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल‌ आभार मानले.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने उपस्थितांची मने जिंकली. तसेच अभिनेत्री नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या नृत्यातून प्रेक्षकांवर भुरळ घातली. यासोबतच महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल यांनी आपल्या
विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांच्या मनात स्थान निर्माण केले.
अतिशय मनोरंजनात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील ‘मैं हु डॉन..’ या गाण्यावर ठेका धरत
उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या शोभा आरोळे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या बेबी हसीना खान, सामाजिक कार्यकर्त्या उमा जाधव, बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या मनीषा मोहळकर, नॅशनल खेळाडू माधुरी भोसले, पीएसआय गायत्री राळेभात, जनविकास सेवाभावी संस्था चालविणाऱ्या लक्ष्मीताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या निलम साळवे, उत्कृष्ट शेती करणाऱ्या काजल मासाळ, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे संघटन करणाऱ्या मनिषा वडे, आधुनिक शेती आणि शेतीपूरक दूध व्यवसाय करणाऱ्या पल्लवी बरबडे, पार्वती खेतमाळस, विविध प्रकारचे मसाले तयार करणारे इंद्रजीत कांबळे, अगरबत्ती व समई वात करणाऱ्या राणी गावडे, दुग्ध प्रक्रिया उद्योग चालविणाऱ्या जयश्री बेंद्रे आदी कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.