Latest Marathi News

Trending Now

जामखेड ग्रामीण रुग्णालय हे जुनी पंचायत समिती येथे स्थलांतरीत

0

जामखेड प्रतिनिधी

दि.०३ मार्च २०२४
जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली होती.जामखेड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे गतवर्षापासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू असून या बांधकामाला गती प्राप्त झाल्यामुळे सद्यस्थितीतील ग्रामीण रुग्णालय (कोविड हॉस्पिटल) येथील ग्रामीण रुग्णालय हे जुनी पंचायत समिती येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. दि.०4 ,मार्च २०२४, सोमवार, सकाळी ०८.०० पासून रुग्णसेवा व रुग्णांशी संबंधित इतर सेवा या जुनी पंचायत समिती कार्यालय येथे सुरू राहतील. शवविच्छेदन गृह हे सद्यस्थितीत चालू असलेल्या ठिकाणीच राहतील आणि इतर ग्रामीण रुग्णालयातील सेवा-सुविधा ह्या स्थलांतरित ठिकाणी देण्यात येतील.
जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास जाऊन नवीन पदनिर्मिती होऊन नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातील तसेच या परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक गतिमान व सुलभतेने पुरवण्याच्या दृष्टीने हे उपजिल्हा रुग्णालय अधिक फायदेशीर ठरणार आहे.जामखेड शहरासह तालुक्यातील व आसपासच्या गावातील नागरिकांना,महिला-बालकांना आरोग्य सोयी सुविधांचा अधिक लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीतील चालू असलेले बांधकामास गती प्राप्त झाल्यामुळे तूर्तास ग्रामीण रुग्णालय हे जुनी पंचायत समिती तहसील आवर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.सदर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातील देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे नागरिकांनी याची नोंद घेऊन स्थलांतरित असलेल्या ठिकाणी रुग्णांशी संबंधित उपचारासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी संपर्क साधण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.