Latest Marathi News

Trending Now

मूनाफ शेख यांची सहायक कुल सचिव पदी नियुक्ती

0

प्रतिनिधि जळगाव(सुरेश कोहली):
इक्रा एज्युकेशन सोसायटी संचलित इक्रा एच .जे.थीम महाविद्यालय जळगाव येथे डॉ. मुनाफ शेख यांचे स्वागत केले. डॉ. मुनाफ शेख यांची कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “सहायक कुलसचिव” पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या इक्रा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, डॉ. इक्बाल शाह, अब्दुल रशीद शेख, प्राध्यापक जफर शेख, तारिक अन्वर, त्याचप्रमाणे प्राचार्य , प्राध्यापक व कर्मचारी यांनी स्वागत केले. आदरातिथ्य स्वीकारताना मुनाफ शेख म्हणाले की, इक्रा एज्युकेशन सोसायटीने मला नेहमीच मदत केली आहे. मी पण विद्यार्थ्यांसाठी जमेल तेवढे काम केले. तुम्ही लोकांनी माझे स्वागत केले याचा मला आज आनंद होत आहे.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चांद खान, उपप्राचार्य डॉ.वकार शेख, उपप्राचार्य डॉ.तन्वीर खान, प्राध्यापक पिंजारी, डॉ.युसूफ पटेल, डॉ.हफीस शेख, डॉ. अमीन काझी, डॉ.इरफान शेख, डॉ.राजू गवारे, पठाण उमर खान, डॉ.अख्तर शाह, अशफाक पठाण, प्रभाकर आप्पा, कामील शेख नजीर, बाबा पटेल रफिक शेख, अब्दुल अजीज शाह, आदी उपस्थित होते.

तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी कामिल शेख नजीर हे रमजानच्या उमराह साठी मक्का व मदिना येथे जात असल्याने त्यांनचां ही इक्रा एज्युकेशन सोसायटी व कर्मचारी वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.