Latest Marathi News

Trending Now

जागतिक महिला दिनानिमित्त मराठवाड्यातील महिला पत्रकारांचा स्त्रीरत्न पुरस्काराने होणार सन्मान – शेख आयेशा

0

बीड प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठवाड्यामध्ये ज्या मुली, महिला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामध्ये पत्रकार या भूमिकेसह माध्यमातील विविध क्षेत्रांमध्ये ज्या काम करत आहेत त्या अभिनंदनास पात्र आहेत.त्यांनी स्वीकारलेले आवाहन सन्मान जनक असल्याने या तमाम महिलांचा आश्रय सेवा केंद्राच्या वतीने नामांकित अशा स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माध्यमात काम करणाऱ्या मुली, महिलांनी 7 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे.
बीड येथील स.मा. गर्गे भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मागे, तुळजाई चौक, बीड या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी 7 मार्च 2024 रोजी सायंकाळी 3 वाजता बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारास पात्र असलेल्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अंतर्गत पत्रकार ते वसुली प्रतिनिधी, ऑपरेटर, कार्यालयीन कर्मचारी किंवा इतर कोणत्याही विभागात कार्यरत आहेत अशा माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा तसेच ज्या महिला संपादक म्हणून काम करत आहेत अशा महिलांचा विशेष सन्मान हा सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन स्त्रीरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारास पात्र असलेल्या माध्यमातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे 70 30 14 93 22 या नंबरवर प्रत्यक्ष संपर्क करून अथवा व्हाट्सअप वर आपला संपूर्ण बायोडाटा, पासपोर्ट फोटो, कोणत्या माध्यमात काम करत आहात त्याच्या नावासह व पदासह माहिती पाठवावी. आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी 7 मार्च रोजी सहकुटुंब, सहपरिवार तसेच मित्र मैत्रीण आप्तेष्ट नातेवाईक यासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे.

चौकट
जगा वेगळं आव्हान स्वीकारणाऱ्या महिलांना आवाहन…
विविध क्षेत्रांमध्ये आव्हानात्मक भूमिका स्वीकारून ज्या महिलांनी त्या क्षेत्रात आपली वाटचाल यशस्वीरित्या सुरू केली आहे, अशा महिलांचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय यासह ज्या महिलांनी आज पर्यंत जे काम फक्त पुरुषच करत होते अशा क्षेत्रात देखील पाऊल टाकून महिला कुठेही कमी नाहीत हे सिद्ध केलं. उदाहरणार्थ रिक्षा चालक, स्कूल वाहन चालक, बस चालक, बसवाहक, टपरी चालक, जिम ट्रेनर, प्लेन – ट्रेन चालक वाहक अशा क्षेत्रात ज्या बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या महिलांनी पदार्पण करून यशस्वी वाटचाल केली आहे. अशा महिला सन्मानास पात्र असून त्यांनी स्त्री रत्न हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमास आपल्या नातेवाईकांसह सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी केले असून यासाठी 70 30 14 93 22 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.