Latest Marathi News

Trending Now

संघर्ष योध्दा मा.मनोज जरांगे पाटील यांचे आभार -नानासाहेब घोडके

0

संपादक : रामेश्वर टिपरे
माजलगाव प्रतिनिधी

२४ फेब्रुवारी ला संपूर्ण भारत देशात जगत गुरू संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी होत असते मात्र याच तारखेला मराठा समाजाचे मोठं आंदोलन सुरू होणार आहे याची कल्पना समाजाचे शिष्टमंडळने काल दि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची सराटी आंतरवली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन जयंतीची पार्श्वभूमीवर पाटलांशी चर्चा केली असता त्यांनी संत रोहिदास महाराजां प्रति आस्था व्यक्त करून या आंदोलनात थोडा बदल करून सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत तहसीलदार यांना निवेदन देऊन सर्व मराठा समाजाच्या बांधवांनी या होणाऱ्या जयंती सहकार्य करावे असे आव्हान मंडळाच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा करून जरांगे पाटील यांनी केले
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून नानासाहेब घोडके यांनी पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन पुढच्या महिन्यात नियोजित होणाऱ्या जयंती चे आमंत्रण ही दिले आणि ते जरांगे पाटील यांनी स्वीकारून सर्व काही सुरळीत झाले तर नक्की येण्याचा प्रयत्न करेल असा शब्द ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी शिष्टमंडळास दिला
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्ह्याधक्ष नानासाहेब घोडके , युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव , दिलीप सोनवणे, सपाटे तात्या,शाहीर अरविंद घोगरे,राजेभाऊ यशवंते, सुदाम यशवंते यांनी जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले

Leave A Reply

Your email address will not be published.