Latest Marathi News

Trending Now

यळकोट यळकोट जय मल्हार करत भ़डार्याची उधळण

0

अंबड प्रतिनिधी

यळकोट यळकोट जय मल्हार करत शिरूर तालुक्यातील अण्णापूर देविचामळा येथील लाळगे कुटुंबानी कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबाचे रितीरिवाज प्रमाणे मंदिरात भंडाराची उधळण करुन “खंडोबाचे घेतले दर्शन.

आज देखील कुलदैवताला नमन करून आपल्या जुन्या रुढी परंपरा कायम ठेवली जातात. याचे एक ज्वलंत उदाहरण शिरूर तालुक्यातील अण्णापूर देविचामळा येथील लाळगे कुटुंब आहे. नुकतेच या कुटुंबातील अक्षय संतोष लाळगे यांचा विवाह जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील कुक्कडगाव येथील प्रतिक्षा राजेंद्र गायकवाड( ऋतुजा )यांचा शुभविवाह रविवारी साखरपुडा मध्ये पार पडला. जुन्या परंपरा जोपासत ह्या कुटुंबातील नवं दांपत्याने हिंदू धर्मात प्रसिद्ध मानलं जाणारे जेजुरी येथील खंडोबा व तसेच तुळजापूर येथील कुलदैवत मानले जाणारे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता यांचे मनोभावे दर्शन घेऊन संसाराची सुरुवात करण्यापूर्वी आज दिनांक 15/02/2024 वार गुरुवार रोजी सत्यनारायणाची महापूजा व मुरळी च जागरण गोंधळ चा व महाप्रसादाचे आयोजन करुन संसाराची सुरुवात करण्याचे आयोजन केलेले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.