Latest Marathi News

Trending Now

बीड विधानसभा मतदार संघात भाजपा कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.विजयजी हरगुडे यांचे गाव चलो अभियान…!

मा.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितत घेणार मोठा कामगार मेळावा

0

संपादक :रामेश्वर टिपरे

श्री.दादासाहेब लक्ष्मणराव नन्नवरे
प्रदेश सचिव तथा मराठवाडा अध्यक्ष
भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र

देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियानास सुरवात झाली आहे.
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती दिनानिमित्त हे अभियान राबवले जात असून, 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान चालू असणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारत सरकारच्या माध्यमातून दहा वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.

या सर्व योजनेंची माहिती सामान्य जनतेला कळावी यासाठी दि 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या दरम्यान गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून,
भाजपा कामगार मोर्चा मा.प्रदेशाध्यक्ष विजयजी हरगुडे बीड तालुक्यातील मौजे बोरफडी/मौनगिरवाडी या ठिकाणी प्रवास करणार आहेत.
यात श्री.क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी,पसायदान प्रकल्प येथेही भेट देणार आहेत.तद्नंतर राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे यांची मौजे पौंडूळ या गावी भेट घेऊन बीड जिल्हा कामगार मेळाव्यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत.

याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चा च्या सर्व प्रदेश, विभाग, जिल्हा तालुका,मंडळ च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.

Leave A Reply

Your email address will not be published.