Latest Marathi News

Trending Now

हनुमान पुत्र ग्रामदैवत श्री मकरध्वज महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आजपासून आरंभ

0

महाराष्ट्र ही देवस्थान व तीर्थक्षेत्रे यांनी गाजवलेली भूमी आहे. बीड जिल्ह्याला महान संतांची परंपरा लाभली आहे जिल्ह्यात अनेक व्यक्ती होऊन गेल, चिंचवण येथील देवस्थान मकरध्वज मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हे मंदिर भारतात दोन ठिकाणी आहे, एक काशी व दुसरे चिंचवण या ठिकाणी असून यामुळे चिंचवणला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरध्वज जन्म पौष शुद्ध पौर्णिमेला झाला, म्हणून चिंचवण येथे जन्मोत्सव निमित्त अगोदर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहाचा प्रारंभ वैकुंठवासी भगवान बाबांनी केला

यांनी ४५ वर्ष समर्थ पणे चालवले. गाथा भजन व पूर्ण सप्ताहाचे नेतृत्व भागवताचार्य ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज कोठुळे हे गेली तीस वषार्पासून करत आहेत. श्री मकरध्वज जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होत असून दि. 18/ ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, यांचे कीर्तन होईल. दि.19. ह.भ.प.प्रकाश महाराज साठे दि.20.ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले,दि.21रामकृष्ण महाराज रंधवे,दि.22 शिवाजी महाराज बावस्कर, दि.23 ह.भ.प.संजय महाराज पाचपोर. दि.24.ह.भ.प.डॉ सुंदाम महाराज पाणेगांवकर,यांचे कीर्तन होईल. दि. 25 जानेवारी 2024 रोजी सूर्योदया बरोबर मकरध्वज जन्मोत्सव साजरा करण्यात येईल व काल्याचे किर्तन व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे होईल, त्यानंतर महाप्रसाद होईल तरी डोंगरपट्ट्यातील / पंचकशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री मकरध्वज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त
आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा. मकरध्वज मंदिर सभामंडप व जन्मोत्सव सोहळ्यासाठी खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आमदार आर. टी. जिजा देशमुख, माजी आमदार केशव दादा आंधळे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले. शासनाने चिंचवण येथील जागृत देवस्थान मकरध्वज मंदिरास सतत दुर्लक्षित केले आहे. महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून पण त्याला तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सर्वसामान्य जनतेने तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी कित्येक प्रयत्न केले तरीही वारंवार या कडे दुर्लक्ष करण्यात आले. या जन्मोत्सव सोहळ्यातुन सामाजिक सलोखा निर्माण होतो. सर्व जाती-धमार्च लोक आपल्या क्षमतेनुसार सहकार्य करतात, चिंचवण येथील मकरध्वज जन्मोत्सव हा सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे सर्व जाती धमार्चे लोक या जन्मोत्सवात सहभागी होतात, मकरध्वज मंदिरास तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सर्वच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन चिंचवण येथील मकरध्वज मंदिरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा. मकरध्वज जन्मोत्सवानिमित्त गेली 62 वषार्पासून चिंचवण येथे अखंड व्यहरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. तसेच समस्त गावकरी यांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजनामागे चिंचवन ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे.

जन्मोत्सव सोहळ्यातील अन्नदाते…

सोपान दत्तू कोठुळे.ज्ञानोबा काभारी कोठुळे, महोन घुले. प्रमेश्वर रंगनाथ मात्रे,इंद्रमोहन पंढरी वाकसे, श्रीकिसन दोडताले,पांडुरंग मात्रे.भागवत सोपान मात्रे, देवानंद दादाभाऊ तांबडे, रमेश बाबासाहेब मात्रे, बाबासाहेब लिंबा कोठुळे, लिंबा मात्रे, शहादेव मात्रे, राजेश नेटके(सरपंच)बाषुराव तांबडे, गोवर्धन तांबडे, रंगनाथ बडे,रामा गणपतराव शिंदे, प्रल्हाद रामनाथ मात्रे,विश्वनाथ सुंदराव बडे,बाबुराव देवराव तवरे,रामनाथ बडे, मेघराज बडे, इंद्रसेन रंगनाथ कोठुळे, सोमनाथ एकनाथ मात्रे, बद्रीनाथ सोपान मात्रे,सोमनाथ बडे पंचदिप परिवार, बालाजी महिपतीराव कोठुळे, हमाल मपाडी संघटना चिंचवण, राधाकिसन कोठुळे, अशोक भागात कोठुळे, गणेश शिवाजी कोठुळे, राम साहेबाराव मात्रे(माजी सरपंच)आश्रुबा धोंडीबा गिलबीले, पांडुरंग धोंडिबा गिलबीले, विठ्ठल धोंडिबा गिलबीले, महाप्रसाद आसाराम बडे,सोमनाथराव बडे,व पंचदिप परिवार तर्फे होईल…

Leave A Reply

Your email address will not be published.