Latest Marathi News

Trending Now

माजी सैनिक मा सरपंच महिपतीराव बाप्पा कोठुळे यांच्या निधनाने वडवणी तालुका पोरका झाला

चीन सोबत झालेल्या युद्धात शत्रूवर यशस्वी चढाई केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली....

0

चीन सोबत झालेल्या युद्धात शत्रूवर यशस्वी चढाई केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली….

वडवणी/प्रतिनिधी
डोंगरपट्ट्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची मान उंचवणारे व त्याचबरोबर देश सेवेसाठी त्यांनी दोन्ही युद्धामध्ये लढाया देखील लढल्या होत्या बाप्पांच्या निधनाने वडवणी तालुका व खासकरून ज्या डोंगरपट्ट्यामध्ये त्यांचे वलय होतं त्या डोंगरपट्ट्यावर मात्र आज शोककळा पसरली आहे वय वर्षे 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास माजलगाव शहरातील संजीवनी हॉस्पिटल येथे घेतला महिपतराव बप्पा कोठुळे मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेकांना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेला आहे मंकावती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशासनामध्ये डॉक्टर इंजिनिअर शिक्षक त्याचबरोबर सैनिक विविध क्षेत्रांमध्ये त्यांचं वलय होतं महिपतराव बाप्पा हे अतिशय स्वाभिमानी आणि स्वाभिमानाने जीवनामध्ये काम त्यांनी केले आहे त्यांच्या माध्यमातून चिंचवण येथील हनुमंताचे मंदिर जीर्णोद्धार त्याचबरोबर अनेक मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी त्यांच्या राजकीय काळामध्ये केला आहे बप्पा आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे सहकारी म्हणून त्यांची वडवणी तालुक्यात व परिसरामध्ये ख्याती आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे महिपतराव बाप्पा कोठुळे यांच्या घरीच अनेक वर्ष मुक्कामी राहायचे त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मुंडे साहेबांना साथ दिली होती महिपतीराव बप्पा कोठुळे यांचं काम परिसराने पाहिलेला आहे आज आपल्यामध्ये ते नसले तरी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते नक्कीच आपल्या सर्वांच्या मनात कायम राहतील सर्वसामान्य कष्टकरी कामगार दिन दलित यांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभा राहण्याचे काम त्यांनी केलेला आहे त्यांच्या सरपंच पदाच्या काळामध्ये त्यांनी चिंचवण गावाला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाण्याचे काम केलेला आहे त्यांच्या माध्यमातून त्यावेळी मोठ्या प्रमाणात विकासाची काम झाली होती आज त्यांच्या निधनाने अतिशय वडवणी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात त्यांचा त्यांची पत्नी जानकाबाई कोठुळे,मुलगा बालाजी कोठुळे, सून ज्योतीताई कोठुळे,त्याचबरोबर त्यांच्या मुली नातवंड असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या आत्म्यास दैनिक भारतीय लोकशाही परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे अंत्यविधी सोमवार दि. चीन सोबत झालेल्या युद्धात शत्रूवर यशस्वी चढाई केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान श्रीमती।इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली….8 रोजी सकाळी 8 वाजता मंकावती विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात येणार आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.