Latest Marathi News

Trending Now

महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्वांनी माहूर मेळाव्यात सहभागी व्हावे – राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे

0

मुंबई /प्रतिनिधी

‘मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण सोहळा येत्या 13 जानेवारी 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार येणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर ,सरचिटणीस मन्सूर भाई,कोषाध्यक्ष विजय जोशी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन राज्यपातळीवर त्यांचा गौरव केला जातो. या वर्षी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे 13 जानेवारी 2024 रोजी एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर नगर आणि दक्षिण नगर जिल्ह्यांना विभागून देण्यात आला आहे.
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
1) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड
2) लातूर विभाग : माहूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड
3) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा धुळे
4) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे
5) अमरावती विभाग : तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला
6) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली
7) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ, जिल्हा वर्धा
8) कोकण विभाग : अंबरनाथ तालुका पत्रकार संघ, जिल्हा ठाणे.या सर्व पत्रकार संघांना पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. या अभुतपुर्व सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेचे बीड,सांगली,सातारा,रत्नागिरी,अहमदनगर,बुलढाणा,नांदेड,लातुर,पुणे,गडचिरोली,सिंधुदुर्ग, सोलापूर,कोल्हापूर,मुंबई, छत्रपती संभाजीनगर,परभणी,हिंगोली,नाशिक,धुळे,रायगड,जालना,वाशिम,भंडारा या सह आदी जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहनही राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.