Latest Marathi News

Trending Now

सिरसाळा पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार : आरोपीच्या अटकेसाठी जिल्हाकचेरीसमोर मुलीच्या कुटुंबाचे अमरण उपोषण

दोन बायकांचा नवरा तरीही ४० वर्षीय तरुण १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घेऊन पसार. दोन महिने झाले तरी पोलिसांना अल्पवयीन मुलगी व आरोपी सापडेना.

0

 

प्रतिनिधी । बीड

दि. २८ : अगोदर दोन लग्न झालेल्या ४० वर्षांच्या व्यक्तीने शेजाऱ्याच्याच १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून धूम ठोकली. ही घटना परळी तालुक्यात घडली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊनही तीन महिन्यांपासून सिरसाळा पोलिसांनी मुलगी व आरोपीचा शोध लावला नाही. अखेर व्यथीत झालेल्या कुटुंबाने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, असे असतानाही पोलिसांकडून याची कसलीच दखल घेतलेली नाही.

पीडितेचे वडील आणि आरोपी या दोघांची शेजारीच शेती आहे.आरोपीचे अगोदरच दोन विवाह झालेले आहेत. परंतु, तरीही त्याने शेजारीच असलेल्या १६ वर्षांच्या मुलीला आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फूस लावून पळवून नेले. नातेवाइकांनी तत्काळ सिरसाळा पोलिस ठाणे गाठून २० ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरही आरोपीच्या अटकेसाठी पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्या.परंतु, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबाने माजलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी,अंबाजोगाईच्या अपर अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली. त्यांना लेखी तक्रार व निवेदन दिले. परंतु, यावर कोणीही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेचे कुटुंब आता न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे. बुधवारी पीडितेच्या आई- वडिलांसह चार मुले व इतर नातेवाइक यांचा उपोषणात सहभाग होता. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा या नातेवाइकांनी घेतला आहे.
[आमच्याकडून तपास केला जात आहे.
आरोपीला सहकार्य करणारा त्याचा भाऊजी यालाही आम्ही अटक केली होती,त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे.त्यानंतर हैदराबाद व इतर ठिकाणीही जाऊन आलो आहोत,तरीही ते सापडले नाहीत. आम्ही प्रयत्न करत आहोत.परंतु, यश येत नाही. लवकरच आरोपीला शोधून मुलगी नातेवाइकांच्या स्वाधीन करु – नागरगोजे तपास अधिकारी सिरसाळा पोलीस ठाणे]

Leave A Reply

Your email address will not be published.