Latest Marathi News

Trending Now

साहेब ,दवाखान्यात डॉक्टर थांबतच नाहीत….

चिंचवण ग्रामीण रुग्णालयात ग्रामस्थांनी मांडल्या समस्या.

0

वडवणी

वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे अनेक वर्षापासून ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे या रुग्णालयामुळे अनेक लोकांना जीवदान मिळाले आहे परंतु आजची परिस्थिती ही अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे रुग्णालयाची दुरव्यवस्था झाल्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे रुग्णांनी तक्रारी केल्यामुळे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य डॉक्टर एल आर तांदळे यांनी रुग्णालयाला भेट दिली असता ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या चिंचवण ग्रामीण रुग्णालयात 24 तास रुग्ण सेवा मिळावी, स्त्री रोग तज्ञाची नेमणूक करावी, डॉक्टरनी ओपीडीतच तपासणी करावी, परिसर स्वच्छ ठेवावा व रुग्णाचे बेड स्वच्छ असावेत अशा अनेक समस्या गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन डॉ. तांदळे यांनी बुधवारी चिंचवण रुग्णालयात भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी अधीक्षक व कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करावी, कार्यालयात वेळेवर हजर राहावे, रुग्णालया अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छ ठेवावा, प्रस्तुती प्रमाण वाढवावे व अशा अनेक सूचना दिल्या

Leave A Reply

Your email address will not be published.