Latest Marathi News

Trending Now

बीआरएस पार्टीचे गुलाबी वादळ पोचले आमदार साहेबांच्या गावात

0

 

बीड प्रतिनिधी

बीआरएस पार्टी अबकी बार किसान सरकार असा नारा देत महाराष्ट्रातील गावोगावी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करत आहे.तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या तेलंगणा मॉडेल ची चर्चा आता महाराष्ट्रातील घरोघरी होताना दिसत आहे.तेलंगणा राज्यामध्ये राबवलेल्या योजना महाराष्ट्रात का राबवल्या जात नाहीत असा प्रश्न देखील सर्वसामान्य जणता विचारू लागली आहे.पक्षाच्या प्रचार प्रसार आणि सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात माजलगाव मतदार संघात पक्षाच्या वतीने जोरदार काम चालवले जात आहे.आणि त्याला सर्वसामान्य, शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसादही मिळत आहे.

येणाऱ्या काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निश्चय पार्टीने केला आहे.बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात धारूर तालुका पक्षाच्या वतीने पिंजून काढला आहे.लवकरच वडवणी तालुक्यात देखील कामाला सुरुवात होणार आहे.माजलगावचे आमदार धारूर तालुक्यातून येतात.त्यांचे गाव धारूर तालुक्यातच आहे.त्यामुळे त्यांच्या गावातही भेट देऊन गावातील शेतकऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणे सांगण्यात आली.लोकांचा प्रतिसाद पाहता माजलगाव विधानसभेचा आमदार बीआरएस पार्टीचा झाल्यास नवल वाटू नये.अशी प्रतिक्रया योगेश साखरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.