Latest Marathi News

Trending Now

BRS Party चे प्रमुख नेते शंकर अण्णा धोंडगे यांची मराठा आंदोलन स्थळी भेट

0

रामेश्वर टिपरे

Date – ३ सप्टेंबर २०२३
जालना ( महाराष्ट्र )
➖➖➖➖➖➖➖
*बी.आर.एस.चे महाराष्ट्राचे प्रमुख नेते मा. आमदार माननीय शंकर अण्णा धोंडगे यांनी आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भाने सुरू असलेल्या उपोषण स्थळी जाऊन मनोज जरांडे, यांच्याशी चर्चा केली, उपस्थित हजारो आंदोलकासमोर या संबंधाने मार्गदर्शन केले, यावेळी आलेल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आजपर्यंत आलटून पालटून सत्तेत आलेल्या सर्व सरकारांने व विरोधकांनी सोडवण्याऐवजी त्यांचे केवळ राजकारण केले, शेजारच्या तेलंगणा राज्यात तिथले मुख्यमंत्री माननीय के. चंद्रशेखर राव यांनी तेथील मराठा समाजाला बी कॅटेगिरी आधारे १२% आरक्षण दिले. व ते देतात महाराष्ट्रात मात्र ते मिळत नाही हा मराठा समाजावरचा या सर्वांनी केलेला घोर अन्याय आहे. या सर्वांना राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांचे व मराठा समाजासह मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, ओबीसी, समाजासह सर्व समाज घटकांचे बरे होणार नाही, त्यासाठी महाराष्ट्रात ही भारत राष्ट्र समितीचे सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याने त्यांनी सर्वांना आवाहन केले.  व जरांडे यांच्या उपोषणाला भारत राष्ट्र समिती पक्षाचा व के. चंद्रशेखरराव यांचा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन केले.*

     *यावेळी त्यांचे सोबत दत्ता पवार- मराठवाडा समन्वयक, रामराव – चव्हाण, लावणीकर – माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्रवीण फुके जिल्हा समन्वयक, संजय सोळंके, राजेंद्र हातोटे, डॉ. अप्पासाहेब कदम- माजी सभापती, बबन गवारे, वायाळ, सतीश ढवळे, सुशील घोटे – लातूर जिल्हा समन्वयक यांचेसह जालना जिल्ह्यातील भारतराष्ट्र समितीचे अनेक प्रमुख उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.