Latest Marathi News

Trending Now

सततच्या पावसाचे अनुदान व पावसाच्या खंडामुळे पीकविमा अग्रिम मंजूर करावा

व इतर प्रश्नांसाठी वडवणी किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन

0

 

  • रामेश्वर टिपरे

भारतीय लोकशाही न्युज

वडवणी/प्रतिनिधी

राज्यावर दुष्काळाचे ढग घोंगावत असताना राज्यातील सर्वपक्षीय पुढारी किळसवान राजकारण करण्यात मशगुल आहेत.
सद्य परिस्थितीत शेतकऱ्यावर ओढावलेले अवर्षणग्रस्त परिस्थितीचे संकट, यावर शासन, प्रशासन लक्ष देणे तर सोडाच पण ब्र शब्द काढायला सुद्धा तयार नाही.

खरीप हंगाम 2023 एकंदर अडीच महिन्याचा पावसाचा कालावधी लोटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. सुरवातीला चांगल्या पावसाची प्रतीक्षा करून म्हणावा तसा पाऊस न झाल्याने अल्प पावसावर पेरणी करावी लागली.

सुरुवातीला सोयाबीन पिकावर गोगलगाय, तसेच सुरुवातीपासून
अवर्षण स्थिती असल्यामुळे एकंदर सर्वच पिकावर रसशोषक किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला. महागड्या औषधांचा वापर करून यावर नियंत्रण मिळवण्याचा शेतकऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केला.

चढ्या भावात होणारी बियाणे व खतांची विक्री या संकटावर मात करून शेतातील सर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. सुरुवातीपासून पुरेसा पाऊस नसल्यामुळे आणि पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीनसारखी पिके ऐन फुलवरा अवस्थेत,नाजूक स्थितीत असल्यामुळे जवळजवळ हातची गेली आहेत.

इतर पिकांची ही वाढ खुंटली असून ती सुकायला,माना टाकायला लागलेली आहेत.सोबतच गुरांच्या चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून आता परस्थिती शेतकऱ्यांच्या हाता बाहेर जात असल्यामुळे तो गोंधळून गेला आहे;

म्हणून अशा शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने उपाययोजना करुन या हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्यांचे पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करावी, पीक हातचे गेल्यामूळे पिक विमा मंजूर करून विम्याची अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी व मागील खरीप हंगामाचे सततच्या पावसाचे अनुदान तात्काळ वाटप करावे, सन 2020 चा पिक विमा त्वरित वितरित करावा, या मागण्या घेऊन आज वडवणी किसान सभेने तहसीलदारांना निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

२१ ऑगस्ट रोजी परळी, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई येथील तहसीलदार या प्रश्नांना घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे तर वडवणी येथे पुढील आठवड्यात आंदोलन करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.