Latest Marathi News

Trending Now

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची होळी..

पोलिस निरिक्षक अमन सिरसट यांच्या कडे दिले मागण्यांचे निवेदन

0

भारतीय लोकशाही न्युज

वडवणी / प्रतिनिधी
पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बीड परळी हायवे रोड वर छञपती शिवाजी महाराज चौकात पञकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची होळी करत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात शहर व तालूक्यातील पञकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाचे निवेदन वडवणी पोलीस प्रशासनाला पोलिस निरीक्षक अमन सिरसट यांच्या कडे देण्यात आले.पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, पञकार हल्याचे खटले जलदगती न्यायालया मार्फत चालवली जावेत, पाचोरचे आ.किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी.आदी मागण्या साठी वडवणी येथे छञपती शिवाजी महाराज चौकात शहर व तालूक्यातील पञकारांनी एकञीत येऊन आंदोलन केले.यावेळी पञकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची जाहिर होळी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.