Latest Marathi News

Trending Now

गेवराई मतदारसंघात मोफत ‘गाव तेथे आरोग्य शिबीर’ ; 1 लाख नेत्र तपासणीचा संकल्प

भारत राष्ट्र समितीचे युवा नेते बाळासाहेब मस्के, मयुरीताई खेडेकर-मस्के यांचा पुढाकार ; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

0

भारतीय लोकशाही न्युज
गेवराई : प्रतिनिधी
गेवराई तालुक्यात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पुढाकाराने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत गाव तेथे आरोग्य शिबीर राबविले जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ बागपिंपळगाव येथे आज शुक्रवार दि.18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजता सुरू होत आहे. यामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड या आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिली जाणार आहेत, तरी या शिबीराचा गेवराई तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बीआरएसचे युवा नेते बाळासाहेब मस्के, गेवराई विधानसभा समन्वयक मयुरीताई खेडकर-मस्के यांनी केले आहे.
बीआरएस पक्षाचे युवा नेते तथा बीएम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के हे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच सामाजिक राबविण्यात अग्रेसर असतात. यावेळी त्यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोन समोर ठेवून गाव तेथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. शुक्रवारी सकाळी बागपिंपळगाव येथून या आरोग्य शिबीराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहेत. तसेच यानंतर आवश्यक त्या रुग्णांवर नंतर टप्याटप्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड या आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिली जाणार आहेत. तसेच बंद पडलेली संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेची नविन नोंदणी देखील यामध्ये नागरिकांना करुन मिळणार आहे. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी चंपावतीपत्रचे संपादक नामदेव क्षीरसागर, झुंजार नेताचे संपादक अजित वरपे, लोकप्रश्नचे दिलीप ख्रिस्ती, टिव्ही 9 चे बीड जिल्हा प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर, कार्यारंभ चे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, झी 24 तासचे बीड जिल्हा प्रतिनिधी विष्णू बुर्गे, लोकाशाचे आवृत्ती प्रमुख भागवत तावरे, बीआरएस पक्षाचे बीड जिल्हा समन्वयक दिलीप गोरे, मराठी महाराष्ट्रचे संपादक संग्राम धन्वे, पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, बागपिंपळगावचे सरपंच रामेश्वर जगताप हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बीआरएस पक्षाच्या गेवराई विधानसभा समन्वयक मयुरी बाळासाहेब मस्के, बाळासाहेब मस्के (बी.एम. प्रतिष्ठान अध्यक्ष तथा दै. पुण्यभूमी संपादक) यांनी केले आहे

गेवराई मतदारसंघात गाव तेथे आरोग्य शिबीर राबविण्यात येत आहे. या शिबिरातून तब्बल 1 लाख नेत्र तपासणी व 11 हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आहे.
बाळासाहेब मस्के
बीएम प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवानेते, बीआरएस पक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.