Latest Marathi News

Trending Now

प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ चेक करा रिजल्ट

0

भारतीय लोकशाही न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 1 जून 2023 शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल. महाराष्ट्रातून 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा सुरू होती.

 

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in

निकाल तपासण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे
उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्रावर किंवा अर्जावर आईचे पहिले नाव आवश्यक असेल.

 

निकाल कसा तपासायचा?

महाराष्ट्र एसएससी निकाल पोर्टल mahresult.nic.in वर जा.
आता, SSC निकालाची लिंक उघडा.
विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.
तुमचा निकाल तपासा आणि डाउनलोड करा.

Leave A Reply

Your email address will not be published.