Latest Marathi News

Trending Now

भाजपा जामखेड शहर सरचिटणीस पदी बाळासाहेब गायकवाड

पक्ष श्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल - बाळासाहेब गायकवाड

0

 

जामखेड प्रतिनिधी

आ. प्रा. राम शिंदे व जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील आणि युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली व आदेशाने तसेच भाजपा शहर अध्यक्ष पवन राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्य चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातांना बळकट करण्यासाठी पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहून गोर-गरिब जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तसेच भारतीय जनता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अधिकाधिक तरुणांना भारतीय जनता पार्टी च्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार व पक्ष श्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल असे यावेळी बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

जामखेड येथील युवा कार्यकर्ते बाळासाहेब साहेबराव गायकवाड यांची भाजपा जामखेड शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.गेल्या १० वर्षांपासून भारतीय जनता पार्टी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची मिळेल ती जबाबदारी घेऊन कार्यधूरा सांभाळत निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले.यापूर्वी भाजपा युवक तालुका सरचिटणीस पदावर काम केले. याच कार्याची पावती म्हणून पक्षाने भाजपा जामखेड शहर सरचिटणीस पदी निवड केली.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पवन राळेभात यांनी निवडीचे पत्र देवून अभिनंदन केले. बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन कले.

Leave A Reply

Your email address will not be published.