Latest Marathi News

Trending Now

राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता यांच्या लेखीआश्वासनानंतर ; ५ एप्रिल रोजी चे रास्ता रोको आंदोलन स्थगित

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा रस्त्याच्या कामांतर्गत येणाऱ्या अडचणी पुर्णपणे सोडवल्या जातील.तसेच येत्या १० दिवसांत महामार्गाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल.अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता तारडे यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात व जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात येणारा रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने होणारा रास्ता रोको आंदोलन आज रोजी स्थगित करण्यात आले. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 च्या बीड रोड तसेच नगर रोड या भागात राहणाऱ्या नागरिकांचे सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या बद्दल तसेच कामाची दिरंगाई होत आहे आणि दर्जाबाबत रस्ता रोको करण्याचा इशारा दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला होता. तसेच निवेदन ही तहसीलदारांना देण्यात आले होते. संबंधित इशाराचे दखल घेऊन आज ४ एप्रिल रोजी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले,राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता तारडे व अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांच्या उपस्थितीत जामखेड पोलीस स्टेशन येथे संयुक्त बैठक झाली. या बैठकीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता तारडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले की, महामार्गाचे कामाबाबत येणाऱ्या अडचणी बाबत योग्य मार्ग काढण्यात येईल.तसेच येत्या १० दिवसांत पूर्ण क्षमतेने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात येईल.असे लेखी आश्वासन दिले. उद्या होणारा रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे याची नागरिक व व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात व ज्येष्ठ नेते सुरेश भोसले म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.