Latest Marathi News

Trending Now

भाजपा ओबीसी जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी दत्तात्रय गिरी

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील युवक कार्यकर्ते दत्तात्रय गिरी यांची भाजपा ओबीसी जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे, भाजपा जिल्हाअध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या आदेशानुसार व खासदार डॉ सुजय विखे,अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा ओबीसी जामखेड तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय गिरी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा ओबीसी जामखेड तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी भाजपा ओबीसी मोर्चा जामखेड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली.माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे, खा. डॉ.सुजय विखे पाटील , युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली व तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष हिताचे काम यापुढे अधिक जोमाने करील. तसेच ओबिसीचे संगठन करून ओबीसींना न्याय हक्क मिळून देण्यात येईल असे दत्तात्रय गिरी यांनी सांगितले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद,माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले ,लोकसभा विस्तारक मनोज (काका)कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, उपाध्यक्ष बापूराव ढवळे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, ॲड प्रविण सानप,शहराध्यक्ष पवन राळेभात,अशोक मोरे,पिंटू (वस्ताद) माने, विलास मोरे, गोरख राजगुरू,सोमनाथ दरे, मुबारक सय्यद, पांडुरंग मोरे, राजेंद्र शिंगणे, विकास मोरे, सुनील जाधव,शैलेश कदम यांनी‌ निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.