Latest Marathi News

Trending Now

नागराज मुरुमकर यांची भाजपा युवा मोर्चा जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड

0

 

जामखेड प्रतिनिधी

आज रोजी आ. प्रध्यापक राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, डॉ भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद,युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामखेड तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.साकत येथील नागराज मुरुमकर यांची भाजपा युवा मोर्चा जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून
यांनी मागील काळामध्ये भाजपा चिटणीस म्हणून काम केले आता पक्षाने त्यांच्या वर भाजपा तालुका युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करुन निष्ठावान कार्यकर्त्याला दिला न्याय.आजपर्यंत माजीमंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे व माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांच्या विचाराने भाजप पक्षामध्ये काम केले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी नागराज मुरुमकर यांना निवडीचे पत्र दिले.
डॉ भगवान मुरूमकर यांचे एकनिष्ट कार्यकर्ते म्हणून नागराज मुरुमकर यांची जामखेड तालुक्यात ओळख आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी पदाचा उपयोग करणार आ.प्रा.राम शिंदे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, भाजपा तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी व सर्वसामान्य लोकांचे कामे करण्यासाठी पदाचा उपयोग करणार तालुका उपाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून सक्षम पणे काम करत आगामी लोकसभा, विधानसभा, निवडणुकीत पक्षाला याची पावती दिसुन येईल असे नव निर्वाचित तालुका उपाध्यक्ष नागराज मुरुमकर यांनी सांगितले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, उपाध्यक्ष विष्णू गंभीरे, शहराध्यक्ष पवन राळेभात व पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी नागराज मुरुमकर यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.