Latest Marathi News

Trending Now

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियमानुसार व जलद गतीने करावे : अन्यथा सदरचे काम बंद पाडले जाईल – जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे काम नियमबाह्यारितीने होत असून यामध्ये महामार्गालगत राहणारे ग्रामस्थ व व्यावसायिकांचा कोणात्याही प्रकारे विचार न करता रस्त्याची उंची व ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामामुळे नागरिकांची घरे व दुकाने चार ते पाच फूट खाली जाणार आहेत. यामुळे पावसाळ्यात घरे व दुकानांमध्ये पाणी घुसून घरातील मालमत्तेचे नुकसान व रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चाळीस वर्षापूर्वी रस्त्याच्या उचीनुसार दोन्ही बाजूनी

बांधकाम केली आहेत. परंतु काळाच्या ओघामध्ये ती रस्ता ३ ते ४ वेळा भरण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या लगतची सर्व बांधकामे ३-४ फुट खाली गेली आहेत. त्यामुळे पूर्वीची गटारही तितकीच खाली गेली आहे. त्यामुळे सद्या होत असलेले रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार व भविष्याचा विचार करून न केल्यास रस्ता व लगतची घरे व इमारती यामध्ये १० फुट अंतर राहणार आहे. व ती रस्त्याच्या ५ ते ६ फुट खाली जाणार
आहेत. त्यामुळे सर्व रहिवाशांचे ड्रेनेजचे पाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास पर्याय राहणार नाही. ते सर्व पाणी रस्त्याच्या गटारीमध्ये जाऊ शकणार नाही. त्यामुळे सर्व बाजारपेठ बाधीत होणार आहे. त्यामुळे आमची वरील समस्या सोडविल्याशिवाय किवा चर्चा केल्याशिवाय होणारे काम आम्ही करू देणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच रस्त्याचे काम फार संथ गतीने चालू आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे सर्व व्यापारी आणि नागरीकांना त्याचा त्रास होत आहे. तरी त्या कामास गती आणावी अन्यथा काम बंद पाडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी कॉचेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी दिला आहे. या निवेदनावर जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,विजय कोठारी, विनायक राऊत, प्रकाश सदाफुले, किरण शिंदे, अंकुश उगले, अविनाश पवार आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.