Latest Marathi News

Trending Now

नवोदय परिक्षेत जामखेड तालुक्यातील ९ विद्यार्थ्यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन

जामखेड ची शैक्षणिक प्रगती ,विकासाची नवी पहाट - गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या प्रेरणेतून व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याच्या वाढत्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला असून जवाहर नवोदय विद्यालयाच्या पात्रता परीक्षेत तालुक्यातील तब्बल ९ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत आपला प्रवेश निश्चित केला आहे.नगर जिल्ह्यात प्रवेश पात्र एकुण ८० विद्यार्थ्यांपैकी जामखेड तालुक्यातील ९ विद्यार्थी म्हणजे एकुण १०% टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली असून जामखेड तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका यांचे तालुक्यातील शिक्षणप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.

जामखेड ची शैक्षणिक प्रगती ,विकासाची नवी पहाट असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका यांचे अभिनंदन असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी काढले.

🔳 *नवोदय परिक्षेतील यशस्वी विद्यार्थी*
१)सायली रामहरी जगताप
२)आदित्य अभिमान घोडेस्वार
३)शौर्य विकास हजारे
४)अर्णव सुभाष ओमासे
५)अर्णव चंद्रकांत गाडेकर
६)शौर्य ब्रह्मदेव हजारे
७)उत्कर्ष रामेश्वर ढवळे
८)शिवसंस्कार दशरथ बिरंगळ
९)सोहम रामनाथ ढाकणे

Leave A Reply

Your email address will not be published.