Latest Marathi News

Trending Now

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पवारवस्ती (पाडळी ) शाळेकतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पाडळी येथील पवार वस्ति जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुरुवार दि. २८/०३/ २०२४ सायंकाळी ८:०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांत मिशन स्कॉलरशिप नवोदय अंतर्गत इयत्ता चौथी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली कुमारी गौरी घनश्याम भोसले समवेत जामखेड तालुका गुणवत्ता यादीतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पालकांसमवेत गुणगौरव करण्यात आला.तसेच गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलशिप नवोदय परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या . यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर,शिक्षक बँक संचालक संतोषकुमार राऊत ,विश्वस्त श्री.मुकुंदराज सातपुते, केंद्रप्रमुख श्री. राम निकम,एकनाथ चव्हाण , पांडूरंग मोहळकर , काकासाहेब कुमटकर, राजेंद्र मडके , बाबासाहेब कुमटकर , अर्जुन पवार , मल्हारी पारखे , किसन वराट , बळीराम अवसरे ,हरिदास पावणे , हरिभाऊ वराडे ,रामंचद्र गाढवे, रामेश्वर ढवळे , अभिमान घोडेस्वार , गणेश रोडे , दादा राऊत , संजय हजारे ,नानासाहेब मोरे , नवनाथ बहिर , गणेश शिंदे ,नेटके सर , तुपसौंदर पोपट , नितीन शिंदे , किरण माने , प्रशांत कुंभार , अमोल रासकर , मारुती फड ,विजय जेधे , मनोज कांबळे , रविंद्र तांबे , सुनिल भामुद्रे ,श्रीम.तारामती मोटे , श्रीम. चंद्रकला खरपुडे , छाया जाधव , स्वाती सरोदे आदी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलाविष्कार अर्थात वार्षिक स्नेहसंमेलनास खूप खूप शुभेच्छा देऊन मिशन आपुलकी अंतर्गत शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पालकांना देणगी देण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांकडून व पालकांकडून ४०,००० रुपयांची देणगी प्राप्त झाली. व संपूर्ण कार्यक्रमांत ३३ ,६७० रुपयांचे बक्षिक मुलांना देण्यात आले . पवारवस्ती (पाडळी) लहान वस्ती असून सुध्दा कार्यक्रमाच्या अगोदरच ४०००० रुपयांचे देणगी देणारी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिली शाळा असेल असे उद्गार गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी काढले . संपूर्ण कार्यक्रमासाठी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( माध्य.) नागनाथ शिंदे यांनी ५००० रु. बक्षिस दिले . एकूण कार्यक्रमात ७३,६७० समाज सहभाग मिळाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल सातपुते तर सुत्रसंचलन मनोजकुमार कांबळे , विजय जेधे व प्रशांत कुंभार यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक ग्रामपंचायत पाडळी ,ग्रामस्थ व सर्व शिक्षकांचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बाळू जरांडे यांनी केले .

Leave A Reply

Your email address will not be published.