Latest Marathi News

Trending Now

संतोष टेकाळे जामखेड गौरव पुरस्काराने सन्मानित

0

 

जामखेड प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी तसेच श्री शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष (बबलु) टेकाळे यांना महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड यांच्यावतीने जामखेड गौरव हा पुरस्कार सपत्नीक प्रदान करण्यात आला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच लोकसेवा हिताचे काम करण्यासाठी सतत अग्रेसर असणारे संतोष (बबलु) टेकाळे हे काम करत आहेत. कोरोना काळातही आपल्या धारकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले होते तसेच गोरगरीब जनतेला अन्नधान्य पुरवण्याचे काम केले. तसेच श्री शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना गेल्या १४ वर्षापासून मोफत दांडपट्टा, भाला, तलवारबाजी, लाठी -काठी रोप मल्लखांब , मल्लखांब,योगासने अशा.भारतीय व्यायामाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत.
अनेक. विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रशिक्षण घेऊन तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर चमकदार कामगिरी करून प्राविण्य मिळवले आहेत. याच कार्याची दखल घेऊन दिनांक २८ मार्च २०२४ रोजी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या आयोजक सौ.रोहिणी संजय काशिद यांच्यामार्फत प्रतिवर्षी देण्यात येणारा जामखेड गौरव पुरस्कार यंदा संतोष (बबलु) टेकाळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, अनंता खेत्रे सर,
नगरसेवक बिभीषण (मामा) धनवडे, केशवराज कोल्हे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

⏺️ प्रतिक्रिया

हा पुरस्कार घेताना मी जरी पुढे दिसत असलो तरी यामागे खऱ्या अर्थाने, माझे आई-वडील, माझे गुरूवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी, माझी पत्नी, माझे सर्व कुटुंबीय तसेच मोलाचे
सहकार्य करणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी व श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेचे सर्व सहकारी यांचा सिंहाचा वाटा आहे . महिला शिवजन्मोत्सव समितीने या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल समितीच्या सर्वांचेच
मनःपूर्वक धन्यवाद !

*संतोष (बबलु) टेकाळे*

Leave A Reply

Your email address will not be published.