Latest Marathi News

Trending Now

बाफना परिवाराने दिला २० मुलींना हक्काचा निवारा ; दोन वर्षांपूर्वी केला होता संकल्प

निवारा बालगृह येथे वसतिगृहाच लोकार्पण सोहळा संपन्न

0

 

जामखेड प्रतिनिधी

युवा उद्योजक आकाश बाफना यांच्या माध्यमातून २० अनाथ मुलींना हक्काचा निवारा मिळाला असून आज रोजी या रुम चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अनाथ मुलींना आश्रय देण्याचे पवित्र काम बाफना परिवारातील आकाश बाफना यांनी केले आहे.जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक आकाश बाफना यांनी आपली मुलगी क्रिशा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मोहा फाटा येथील समता भूमी, निवारा बालगृहात साजरा केला होता.या निवारा बालगृहात असणाऱ्या अनाथ मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र रूम नाहीत ही अडचण लक्षात घेऊन मुलींसाठी दोन रूमचे वस्तीगृह बांधण्याचा संकल्प केला होता. या रूममध्ये वीस मुलींसाठी कायमस्वरूपी राहण्याची सोय झालेली असून ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा फाटा येथील समता भूमी निवारा बालगृह सुरू आहे. बाफना परिवाराने मुलीच्या वाढदिवशी दोन रूम वस्तीगृह बांधण्याचा संकल्प केला होता तो आज रोजी पूर्ण झाला असून त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कामामुळे बाफना परिवाराचे ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी कौतुक केले आहे. हे पवित्र कार्य प्रामाणिकपणे केल्यामुळे संस्थेचे अधिक्षक वैजिनाथ केसकर ,व्यावस्थापक संतोष चव्हाण,अनभुले यांनी आभार मानले. तसेच याप्रसंगी युवा उद्योजक आकाशजी बाफना व रोशनजी बाफना यांनी आपला वाढदिवस या मुलांसोबत साजरा केला.
यावेळी महेश नगरे , दिलीप बाफना,अभय बाफना ,गौतम दादा बाफना, मिथुन बाफना, अनिल बाफना, कृष्णराव चव्हाण, परशुराम भांगे ,अशोक कुमटकर, गणेश भवर, बाळासाहेब नवसरे, यश भंडारी, निलेश देशमुख,दत्तात्रय जगताप व बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच सेवा भावी बाफना परिवार मधील आदी महिला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.